कोणत्याही रुग्णालयात सर्वसामान्यांचा कक्ष अर्थात जनरल वॉर्ड हा उच्च दर्जाच्या आणि आधुनिक सेवांपासून वंचित असल्याचा अनुभव येतो.
मात्र कमलनयन बजाज रुग्णालयातील जनरल वॉर्ड सुद्धा आता संपूर्णपणे वातानुकूलित अर्थात एसी करण्यात आला आहे.
सध्या उन्हाळ्यात तापमान प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि उकाड्याने जीव हैराण होतो आहे; याची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने जनरल वर्ड वातानुकूलित करण्याचा निर्णय घेतला
सध्या एका भागाचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या भागाचे काम लवकरच पूर्ण होत आहे.
दरम्यान या वातानुकूलित जनरल वॉर्ड चे मान्यवरांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले. रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.
यावेळी रुग्णालयाचे सीईओ डॉ. जॉर्ज फर्नांडिस यांनी रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच त्यांना सर्व सुविधा देण्यासाठी तत्पर असल्याची ग्वाही दिली.
यावेळी डॉ. अजय रोटे आणि रुग्णालयाची टीम त्यांच्यासोबत होती.
© 2023, KBH. All Rights Reserved.