या बैठकीत डॉ.नेहा पाटणकर यांनी मानसिक आरोग्य आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांच्या भावनिक स्वास्थ्याबद्दल मार्गदर्शन केले.
डॉ.राजेश सावजी आणि डॉ.कल्याणसिंग गोठवाल यांनी उपचाराच्या विविध पद्धतींवर चर्चा केली. डॉ.श्रवणकुमार तुंगणवार, डॉ.प्रशांत सूरकर, डॉ.अभिनव झंवर, डॉ.प्रेरणा देवधर, डॉ.वेदयत्री देशमुख आणि डॉ.स्वाती गुरखे यांनीही त्यांच्या क्षेत्रातील उपचार पद्धती, आणि जीवनशैलीतील बदलांवर चर्चा केली. आहारतज्ञ वैशाली भालेराव यांनी कॅन्सर रुग्णांसाठी योग्य आहाराच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले.
ही बैठक रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरली.
© 2023, KBH. All Rights Reserved.