ज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात त्या काश्मीर मधील पहलगाम इथे पर्यटकांना नरकयातना भोगाव्या लागल्या.
अतिरेक्यांनी भ्याड आणि संतापजनक हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केली आणि अनेकांना जखमी केले, हे आपण जाणतोच.
त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता कमलनयन बजाज रुग्णालयात प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती.
त्या निष्पाप पर्यटकांच्या स्मृतींना वंदन करत त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
दिवंगत पर्यटकांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपल्यासह संपूर्ण देश सहभागी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
© 2023, KBH. All Rights Reserved.