स्मरण तुझे माऊली, तुझ्या नंतरही उरले.
अस्तित्व तुझे इथेच नांदते, जरी जीवन सरले!
मरावे परी कीर्तीरूपी उरावे, ही ओळ आता कालसुसंगत करत, मरावे परी अवयवदानाने उरावे अशी संयुक्तिक झाली आहे.
कुटुंबात मुख्य भूमिका निभावणाऱ्या कर्त्या स्त्रीच्या निधनाचा धक्का सोसत असताना, तिच्या दानी वृत्तीचे स्मरण करत अवयवदानाचा निर्णय घेणारे बाहेती कुटुंब आणि त्यांच्या पाठीशी मोठ्या भावासारखे उभे राहिलेले कमलनयन बजाज रुग्णालयाचे प्रशासन.
तिघांना जीवदान आणि अन्य दोघांना दृष्टीदान देणाऱ्या माणुसकीच्या वर्तनाचे हे प्रतिबिंब!
त्यांच्या या कृतीला रुग्णालयाने दिलेली ही मानवंदना!
© 2023, KBH. All Rights Reserved.