कोणत्याही रुग्णालयात गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांना अतिदक्षता विभागात म्हणजेच आयसीयु मध्ये ठेवले जाते.
त्या रुग्णांवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असते, यासाठी पुण्या मुंबईतल्या मोठ्या रुग्णालयात काही विशेष यंत्रणा स्थापन केलेल्या असतात.
आपल्या छत्रपती संभाजीनगरातील कमलनयन बजाज रुग्णालयात आता Advanced Monitoring System बसवण्यात आली आहे.
ही अत्याधुनिक यंत्रणा आयसीयु मधील रुग्णांच्या तब्येतीची प्रत्येक सेकंदाची माहिती आणि घडामोडी डॉक्टरांना देते.
त्यानुसार अगदी बारीक सारीक सुद्धा बदल नजरेतून सुटणार नाही आणि तात्काळ योग्य ती पावले उचलता येतील.
मुख्य म्हणजे संबंधित डॉक्टर रुग्णालयात कोणत्याही ठिकाणी कामात असले तरी, कुठूनही ही माहिती घेत ते रुग्णावर लक्ष ठेवू शकतात.
दर्जेदार रुग्णसेवा आणि तात्काळ उपचार यांना कायम सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या कमलनयन बजाज रुग्णालयाने ही यंत्रणा स्थापन करून पुन्हा एकदा आपल्या रुग्णांसाठी अत्यंत उपयोगी असे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
ही Advanced Monitoring System रुग्णांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी प्रभावी उपचार देण्यात उपयोगी ठरेल यात शंका नाही
© 2023, KBH. All Rights Reserved.