preloader
Edit Content

Contact Info

सि पी आर (CPR) दिला राखूनी प्रसंगावधान । एस आर पी एफ (SRPF) जवानाने वाचविले सहकाऱ्याचे प्राण ।।

कमलनयन बजाज रूग्णालयातर्फे मागिल काही दिवसापासून सेव्ह अ लाईफ कार्यक्रम (Save A Life Campaign) जनजागृतीसाठी राबवण्यात येतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये रूग्णालयात पोहचण्यापुर्वी दिलेले प्रथमोपचार जीवन संजिवनी ठरू षकतात. हा या कार्यक्रमाचा पाया आहे.

नुकताच याचा प्रत्यक्ष अनुभव आला. एस आर पी एफ कॅम्पमधिल एका जवानाला आपत्कालीन वैद्यकिय परिस्थिती निर्माण झाली त्यांचे सहकारी श्री.विजय मदन परमार व श्री.विनोद प्रकाष हिवाळे यांनी प्रसंगावधान राखून सी पी आर सुरू केला व त्याला कमलनयन बजाज रूग्णालयाच्या आपघात विभागात घेउन आले.

कमलनयन बजाज रूग्णालय, मराठवाडयातील सर्वात अद्यायावत व खऱ्या अर्थाने परिपुर्ण रूग्णालय असुन एका छताखाली सर्व वैद्यकिय सुविधा उपलब्ध केल्या जातात. I Am Emergency Ready हे सर्वांचे ब्रिद वाक्य आहे. याला अनुसरून तात्कालिक प्रथमोपचार व विनाविलंब आरोग्यसेवा यामुळे एका जवानाचा प्राण वाचविण्यात यष आले.

ज्या दोन जवानांचा प्रसांगवधानाने त्यांच्या सहकाऱ्याचे प्राण वाचले. त्यांचा कमलनयन बजाज रूग्णालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी एस आर पी एफ चे जवान, सुप्रीम कमांडर श्री.विक्रम साळी साहेब आवर्जुन उपस्थित होते.

रूग्णालयाचे विष्वस्त श्री.सी.पी. त्रिपाठी सर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॉर्ज फर्नांडिस  व वैद्यकिय संचालक डॉ.अजय रोटे यांनी डॉक्टर व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.